'डॉक्टर चिंतेत; देश वाचवू की, दंगलखोर'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

'डॉक्टर चिंता में हैं...देश को बचाए या दंगाई को?' राष्ट्रधर्म का पालन हों। असं वादग्रस्त ट्वीट पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलं आहे. याचा अर्थ 'डॉक्टर चिंतेत आहे की, देशाला वाचवू की, दंगलखोराला हा प्रश्न आहे. राष्ट्रधर्माचे पालन व्हायला हवे.

नवी दिल्ली- 'डॉक्टर चिंता में हैं...देश को बचाए या दंगाई को?' राष्ट्रधर्म का पालन हों। असं वादग्रस्त ट्वीट पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलं आहे. याचा अर्थ 'डॉक्टर चिंतेत आहे की, देशाला वाचवू की, दंगलखोराला हा प्रश्न आहे. राष्ट्रधर्माचे पालन व्हायला हवे.

स्वाईन फ्ल्यू झाल्याने भाजप अध्यक्ष अमित शहा सध्या रुग्णायलात उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी शहांचे नाव न घेता हे वादग्रस्त ट्वीट केलं आहे. हार्दिक यांच्या या ट्वीटनंतर मोठा वाद तयार झाला आहे. कारण हार्दिक यांनी अप्रत्यक्षपणे अमित शहा यांच्यावर निशाणा साधत त्यांची थट्टा केल्याचं भाजप नेत्यांच्या म्हणणे आहे.

दरम्यान, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लुची लागण झाली. त्यांच्यावर सध्या 'एम्स'मध्ये उपचार सुरू आहेत. ही माहिती खुद्द अमित शहांनीच ट्विटवरून दिली होती. त्यावर काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद यांनी दिलेली प्रतिक्रिया आता वादाचं कारण ठरली होती.

Web Title: hardik patel controvertial tweet amit Shaha