तुरुंगात जाण्याच्या भीतीने पक्ष सोडला; हार्दिकवर कॉंग्रेसचा घणाघात

hardik patel left the party fearing to go to jail claims gujarat congress president
hardik patel left the party fearing to go to jail claims gujarat congress president

अहमदाबाद : हार्दिक पटेलने काँग्रेस सोडल्याच्या एका दिवसानंतर, पक्षाच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी गुरुवारी दावा केला की, त्याच्यावर दाखल केलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्यांसाठी तुरुंगात जाण्याची भीती असल्याने हार्दिक पटेलने हे पाऊल उचलले आहे. हार्दिक पटेल सत्ताधारी भाजपमध्ये सामील होऊ शकतात, असा दावाही ठाकोर यांनी केला.

हार्दिक पटेल यांनी येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर लगेचच काँग्रेस नेत्याने हे दावे केले आहेत. पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी असतानाही आपल्याला कोणतेही अर्थपूर्ण काम दिले जात नसल्याचा आरोप पटेल यांनी केला होता. तसेच हार्दिक पटेल यांनी असा आरोप केला की, पक्षाकडे कोणतीही दूरदृष्टी नाही आणि त्यांची राज्य युनिट जाती-आधारित राजकारण करण्यात गुंतलेली आहे.

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर बुधवारी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. या नंतर हार्दिक पटेल यांनी दावा केला की काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांचे लक्ष हे त्यांच्या मोबाईल फोनवर असतं आणि गुजरात काँग्रेसचे नेते त्यांच्यासाठी चिकन सँडविचची व्यवस्था करण्यात व्यस्त आहेत. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या एका वर्षानंतर जुलै 2020 मध्ये त्यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते.

राजकोटमध्ये पत्रकारांशी बोलताना ठाकोर यांनी आरोप केला की पटेल यांनी आदल्या दिवशी पत्रकार परिषदेत जे काही सांगितले आणि त्यांच्या राजीनामा पत्रात जे काही लिहिले होते ते सत्ताधारी भाजपने तयार केले होते. ठाकोर यांनी दावा केला की, हार्दिकला भीती होती की आपण काँग्रेसमध्ये राहिल्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागेल. त्यामुळे संभाव्य शिक्षेपासून वाचण्यासाठी त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते भाजपमध्येही सामील होऊ शकतात.

एकेकाळी पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाचे नेते असलेले हार्दिक पटेल यांना गुजरातमध्ये सुमारे 25 फौजदारी खटल्यांचा सामना करावा लागत आहे, ज्यात अहमदाबाद आणि सुरत येथे राजद्रोहाच्या आरोपांवरील प्रत्येकी एक एफआयआरचा समावेश आहे. कार्याध्यक्ष असूनही पटेल यांना बाजूला ठेवल्याच्या आणि कोणतेही महत्त्वाचे काम न दिल्याच्या आरोपांचे खंडन करून ठाकोर म्हणाले की, पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना स्टार प्रचारक बनवले होते.

तसेच ठाकोर यांनी दावा केला, इतकेच नाही तर त्यांना हेलिकॉप्टर आणि विमानांमध्ये प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली होती. राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या बैठकांमध्ये त्यांना नेहमीच महत्त्व दिले जात होते. पटेल हे काही काळ भाजपच्या संपर्कात असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या एक महिन्यापासून ते ज्या पद्धतीने (नेतृत्वाविरुद्ध) बोलत होते, त्यावरून त्यांच्या पुढील कृतीचे संकेत मिळत होते. ते भाजपच्या संपर्कात असल्याचेही आम्हाला माहीत होते. पण तुरुंगात जाण्याच्या भीतीने तो इतक्या सहजासहजी शरणांगती पत्करणार नाहीत, असा आम्हाला विश्वास असल्याने आम्ही हे प्रकरण सौहार्दपूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करत होतो, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com