हार्दिक पटेल यांची सहा महिन्यानंतर 'घरवापसी'

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

अहमदाबाद: पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांचे सहा महिन्यांनंतर आज (मंगळवार) गुजरातमध्ये आगमन झाले. राजस्थानच्या सीमेवर असलेल्या रतनपूर गावात त्यांच्या समर्थकांनी हार्दिक पटेल यांचे जोरदार स्वागत केले.

तेवीसवर्षीय हार्दिक पटेल हे आपल्या समर्थकांसह चार गाड्यांतून उदयपूरहून गुजरातकडे रवाना झाले आणि शांततापूर्ण वातावरणात त्यांनी गुजरातमध्ये प्रवेश केला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचे एक पथक गुजरात सीमेपर्यंत हार्दिक पटेल यांच्यासमवेत गेले होते. आज दुपारी रतनपूर सीमेवर हार्दिक पटेल येताच पटेल समजातील शेकडो युवकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर पटेल समाजाच्या एका सभेला मार्गदर्शन करण्यासाठी साबरकांठा जिल्ह्यातील हिंमतनगर शहराकडे रवाना झाले. या वेळी हार्दिक पटेल यांनी आपण नेहमीच आपल्या समाजाच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला आहे आणि करत राहू, असे नमूद केले.

Web Title: Hardik Patel returns to Gujarat