'हार्दिक पटेल २० दिवसांपासून गायब'; पत्नी किंजल यांचा दावा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

गुजरातमधील पाटीदार आंदोलनात झळकलेला नेते हार्दिक पटेल २० दिवस बेपत्ता असल्याचा दावा त्यांच्या पत्नी किंजल पटेल यांनी केला आहे. गुजरात पोलिस हार्दिक यांना लक्ष्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

अहमदबाद : गुजरातमधील पाटीदार आंदोलनात झळकलेला नेते हार्दिक पटेल २० दिवस बेपत्ता असल्याचा दावा त्यांच्या पत्नी किंजल पटेल यांनी केला आहे. गुजरात पोलिस हार्दिक यांना लक्ष्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली १८ जानेवारीला अटक करण्यात आली होती. मात्र, पोलिसांकडूनच आता हार्दिक कुठे आहेत, असे विचारले जात असल्याने किंजल यांनी ते बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त केला आहे. हार्दिक पटेल यांनी इतर लोकांना भेटू नये असे गुजरात सरकारला वाटत आहे, त्यामुळेच त्यांना अशी वागणूक मिळत आहे, असाही आरोप किंजल यांनी यावेळी केला. 

#PulwamaAttack 'पुलवामा नहीं भूलेंगे...'; हुतात्म्यांना देशभरातून श्रद्धांजली

पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी हार्दिक पटेल लढत आहेत. २५ ऑगस्ट २०१५ ला हार्दिक पटेल यांनी अहमदाबाद येथे आरक्षणासाठी रॅली काढली होती. यामुळे गुजरातमध्ये हिंसाचार भडकला होता. यावेळी हार्दिक व त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, यातील काही जण भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये गेलेल्या लोकांवर मात्र देशद्रोहाचा आरोप करण्यात येत नाही, मात्र हार्दिक यांच्यावरच हा आरोप केला जातोय व त्यांना कुठे ठेवलंय माहीत नाही, असे किंजल यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hardik Patel wife Kinjal Patel claims that he is missing from 20 days