#PulwamaAttack 'पुलवामा नहीं भूलेंगे...'; हुतात्म्यांना देशभरातून श्रद्धांजली

Tribute to Pulwama attack martyard on social media
Tribute to Pulwama attack martyard on social media

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मागील वर्षी १४ फेब्रुवारीला जैशे महंमद दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात ४० जवान हुतात्मा झाले होते. जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवले व मोठा स्फोट झाला. आज (ता. १४) या दुर्दैवी घटनेला १ वर्षं पूर्ण होतंय. देशभरातून हुतात्म्यांना श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे की, 'पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन. आपल्या मातृभूमीसाठी प्राणांचा त्याग केलेल्या शूरवीरांना व त्यांच्या कुटूंबियांना प्रणाम करतो.' अशा शब्दांत शहा यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत काही सवाल उपस्थित केले आहेत. 

तसेच सीमा सुरक्षा दल, सीआरपीएफनेही हुतात्म्यांना अभिवादन केले आहे. तर वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी सुंदर वाळू शिल्प साकारत पुलवामा हल्ल्यातील जवानांना मानवंदना दिली आहे. 

मागील वर्षी झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे देशासह जगाला धक्का बसला होता. भारतीय लष्कराने या हल्ल्याचा बदला बालाकोटवर हल्ला करून घेतला होता. या हल्ल्यात जवानांनी बालाकोटमध्ये जैशे महंमदचे दहशतवादी तळ नष्ट केले होते. उरीवरील भारतीय लष्कराच्या तळांवरील हल्ल्यांनंतर पुलवामात बसवर केलेला हल्ला हा सर्वात मोठा हल्ला होता. 

असा झाला होता हल्ला...
- दुपारी ३.१५ च्या सुमारास जवानांच्या वाहनांचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे निघाला. 
- श्रीनगरपासून वीस किलोमीटर अंतरावर असताना अवंतीपुरा येथे "जैशे महंमद'च्या दहशतवाद्यांनी सुरक्षा यंत्रणा भेदत ताफ्यातील एका वाहनावर आपली गाडी धडकवली. 
- ताफ्यातील वाहनामध्ये ४० जवान होते. धडक बसताच मोठा स्फोट होऊन वाहनाचा केवळ सांगाडा उरला. स्फोटामुळे वाहनाचे तुकडे शंभर मीटरपर्यंत फेकले गेले. ताफ्यातील इतर वाहनांचेही नुकसान झाले.
- काही गाड्यांवर गोळ्यांच्याही खुणा. लपून बसलेल्या इतर दहशतवाद्यांनीही गोळीबार केल्याची शक्‍यता. 
- दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटके कशी आणि सुरक्षा यंत्रणा कशी भेदली, याचा तपास सुरू.

पुलवामात हुतात्मा झालेल्या सर्व जवानांना आज देशभरातून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर #PulwamaAttack, #PulwamaNahinBhulenge, #Pulwamamartyrs हे हॅशटॅग ट्रेंडिग आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com