भाजपने खरंच करोडो रुपये खर्च करून हार्दिक पटेलची SEX CD बनवली होती का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hardik patel with girl in room sex cd video goes viral

भाजपने खरंच करोडो रुपये खर्च करून हार्दिक पटेलची SEX CD बनवली होती का?

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधीच काँग्रेसचे (Congress) नेते हार्दिक पटेल (Haridik Patel) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. हार्दिक पटेल यांनी 2015 ला गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनाचे नेतृत्व केले होते. पाटीदार आरक्षण आंदोलनानंतर हार्दिक पटेल यांना देशभरात एक ओळख मिळाली. तसेच 2017 च्या गुजरात निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. हार्दिकने 2019 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करत सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी त्याच्या आयुष्यात अशी एक अशी घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

ते प्रकरण होतं हार्दिक पटेलच्या कथित सेक्स सीडीचं.

हि घटना होती गुजरात विधानसभा निवडणूक 2017 सुमारे महिनाभरापूर्वीची. तेव्हा अचानक कुठून तरी हार्दिक पटेल एक सेक्स सीडी मीडिया समोर आली. त्यामुळे गुजरात मध्ये चांगलीच खळबळ उडाली. अनेकांच्या मोबाईलमधून हार्दिक पटेलचा तो कथित व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. गुजरातच्या राजकारणामध्ये सुद्धा सेक्स सीडीवरून चांगलाच गोंधळ उडाला होता. तो सेक्सचा व्हिडिओ देशभरात सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. न्यूज चॅनल्सवर दोन दिवस तो कथित सेक्स व्हिडिओ दाखवल्या जात होता, ज्यामध्ये हार्दिक पटेल एका तरुणीसोबत बसलेला होता. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तरुणाचा चेहरा हार्दिक पटेलसारखा दिसत होता. त्यामध्ये तरुणीचा चेहरा दिसत नव्हता. छुप्या कॅमेऱ्याने शूट केलेल्या त्या व्हिडिओमध्ये हार्दिक पटेलचे स्टिंग ऑपरेशन केले असल्याचे विरोधी नेत्यांकडून सांगितले जात होते.

मात्र त्याचदरम्यान भाजप नेते अश्विन सांकड़सरिया आणि केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया त्याचे काही सेक्सी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक नवे वळण मिळाले. मंडावियाचा आणि अश्विनचा व्हिडिओ आणि सेक्सी फोटो समोर आल्यानंतर हार्दिक पटेलने आणि काँग्रेसने भाजपवरील हल्ला चढवला होता. त्यावर अश्विन बोलला होता की, सेक्स व्हिडिओ सीडीशी माझा काही संबंध नाही.

त्यादरम्यान सेक्स सीडी प्रतिक्रिया व्यक्त करताना हार्दिक पटेल म्हणाला, मी नामर्द नाही, पण जर मी व्हिडिओमध्ये असतो तर मी उघडपणे समोर आलो असतो. मी पुरुष आहे, नपुंसक नाही, मला जे करायचं आहे ते छाती ठोकुण करेन. याला गलिच्छ राजकारण म्हणतात 'जी सेक्स सीडी बाहेर आली आहे ती बनावट आहे. हा व्हिडिओ खोटा असून भाजपच्या गलिच्छ राजकारणाचा एक भाग आहे. तुम्हाला जे करायचे ते करा मी मागे हटणार नाही. 23 वर्षीय हार्दिक आता मोठा होत आहे. माझी बदनामी करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात.

गुजरातची ती विधानसभा निवडणूक हार्दिक पटेलच्या सेक्स व्हिडीओ मुळे गाजली. मात्र विरोधकांचा हा बाण त्यांच्यावरच उलटला. जनतेची सहानुभूती हार्दिकच्या पाठीशी उभी राहिली. या फुसक्या आरोपांमुळे कथित व्हिडीओ प्रकरणामधून हार्दिक पटेल सहीसलामत सुटला.