हार्दिक पटेल यांच्यावर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; 'या' पदावर केली नियुक्ती

Hardik Patel's Appointment as Working President of Gujarat Unit
Hardik Patel's Appointment as Working President of Gujarat Unit

अहमदाबाद : काँग्रेसने हार्दिक पटेलवर एक मोठी जबाबदारी दिली आहे. गुजरात काँग्रेसच्या कार्यध्यक्षपदी हार्दिक पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हार्दिक पटेल हे पाटीदार आरक्षण आंदोलनातून उदयाला आलेले युवा नेते आहेत. काँग्रेसचे संघटना महासचिव केसी वेणुगोपाल यांनी पटेल यांच्या नियुक्तीबाबत माहिती दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनीनी हार्दिक पटेल यांची तत्काळ नियुक्ती कराण्याला परवानगी दिली असल्याचे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. हार्दिक पटेल यांच्याशिवाय काँग्रेसने महेंद्रसिंग परमार यांना आणंद, आनंद चौधरी यांना सूरत आणि यासीन गज्जन यांची देवभूमी द्वारका जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आल्याची माहितीही वेणुगोपाल यांनी दिली आहे.
---------------
ब्रिटनचे पंतप्रधान म्हणतायेत; आता घराबाहेर पडा
---------------
काँग्रेसला बसणार मोठा धक्का? २२ आमदार दिल्लीत 
---------------
दरम्यान, उत्तम वक्ता असलेले हार्दिक पटेल सरदार वल्लभ भाई पटेल यांना आपले स्फुर्तिस्थान मानतात. त्यांच्या अनेक सभांमध्ये श्रोते सरदार पटेलांच्या चेहऱ्याचे मुखवटे घालून येतात. पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या संयोजनाचे महत्वाचे काम हार्दिक पटेल यांनी केले होते. गुजरात मधील पटेल समाजास नोकरी आणि शिक्षणात राखीव जागा देण्यासाठी त्यांनी मोठी चळवळ उभी केली होती. पाटीदार समाजाचा नेता म्हणून हार्दिक पटेल यांची ओळख असून पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा हार्दिक पटेल हे चेहरा होते. काही दिवसांनंतर हे आंदोलन काही प्रमाणात शांत झाले आणि हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता काँग्रेसने हार्दिक पटेल यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीचे सर्वाकडून कौतुक होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com