

Harish Rana Died
Esakal
Harish Rana Died: गेल्या १३ वर्षांपासून कोमात असलेल्या हरिश राणा याची मरणयातनांमधून सुटका झाली. सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाला परवानगी दिल्यानंतर एम्समध्ये हरिश राणाची लाइफ सपोर्ट सिस्टिम हटवण्यात आली होती. त्यानंतर त्याचे पाणीही बंद केले होते. हरिश राणाने मंगळवारी शेवटचा श्वास घेतला. १४ मार्चपासून एम्सच्या आयआरसीएचच्या पॅलेटिव्ह केअर वॉर्डमध्ये हरिशला दाखल केलं होतं. भारतात पहिल्यांदाच निष्क्रिय इच्छामरण देण्यात आलं.