काँग्रेसला आणखी एक मोठा झटका; माजी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जुलै 2019

काँग्रेसमधील राजीनाम्याचे सत्र काही थांबत नाही. काँग्रेसच्या जवळपास 140 ते 150 नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरिश रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसमधील राजीनाम्याचे सत्र काही थांबत नाही. काँग्रेसच्या जवळपास 140 ते 150 नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरिश रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

काल (ता.04) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हरिश रावत यांच्या रूपानं काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. लोकसभेत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला आहे.

राहुल गांधी यांनी राजीनामा देताना 'मला दु:ख आहे की, माझ्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर कोणत्याही काँग्रेसच्या नेत्यानं पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला नाही’ त्यानंतर जवळपास काँग्रेसच्या 140-150 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. त्यांतर आज हरिश रावत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harish Rawat Resigns As Congress In-Charge Of Assam