Harish Salve on Protests in India
ESAKAL
देशात सध्या सुरू असलेल्या आंदोलनांमागे परदेशातून आर्थिक मदत मिळत असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ विधिज्ञ आणि भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी केला आहे. भारतात बांगलादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये बोलताना साळवे यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली. त्यांच्या या आरोपांनंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.