प्रियकरासोबत पळून गेल्याने ग्रामस्थांनी तरुणीला दिली शिक्षा, तोंडाला फासले काळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

प्रियकरासोबत पळून गेल्याने ग्रामस्थांनी तरुणीला दिली शिक्षा, तोंडाला फासले काळे

अहमदाबाद : प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून ग्रामस्थांनी तरुणीच्या तोंडाला काळे फासल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुजरातमधील पाटन परिसरातील हार्जी या गावात ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार : 'रझा अकादमीसह अन्य घटकांचा करणार तपास', गृहमंत्र्यांची माहिती

हार्जी ही वाडी आदिवासी समुदायाची वस्ती आहे. याच गावातील एक तरुणी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यामुळे त्यामुळे आदिवासी समाजाची बदनामी झाल्याचा समज या ग्रामस्थांचा आहे. त्यामुळे त्यांनी तिला शिक्षा देण्याचे ठरवले. तिला परत आणून तिच्या तोंडाला काळे फासण्यात आले. व्हिडिओमध्ये ती तरुणी जोरजोरात रडत असून मला सोडा, अशी विनंती ग्रामस्थांना करताना दिसतेय. मात्र, ग्रामस्थ तिच्याकडे दुर्लक्ष करतात. ती मोठ्याने ओरडल्यानंतर परत तिच्या तोंडाला काळे फासले जाते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन कामाला लागले असून पाटणचे पोलिस अधीक्षक सुप्रीत सिंग गुलाटी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी याप्रकरणी 15 जणांना ताब्यात घेतले. "गुजरातच्या पाटणमधील हर्जी भागात ही घटना घडली आहे. वाडी समुदायाचे लोक अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शिक्षा करतात. मात्र, ते कायद्याचे उल्लंघन आहे. याप्रकरणी आतापर्यंत 17 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पाच जे लोक व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होते, त्यांची चौकशी केली जात आहे'', असे सुप्रीतसिंग गुलाटी यांनी सांगितले.

loading image
go to top