हार्ले डेव्हिडसनवर बहिष्काराची मोहीम

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

हार्ले डेव्हिडसन कंपनीने अमेरिकेतून इतर देशात उत्पादन प्रकल्प हलविण्याची योजना आखल्याने कंपनीच्या दुचाकींवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले आहे. 
 

वॉशिंग्टन : हार्ले डेव्हिडसन कंपनीने अमेरिकेतून इतर देशात उत्पादन प्रकल्प हलविण्याची योजना आखल्याने कंपनीच्या दुचाकींवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले आहे. 

याविषयी ट्रम्प यांनी ट्विट केले आहे. यात म्हटले आहे, की हार्ले डेव्हिडसन कंपनीने उत्पादन प्रकल्प दुसऱ्या देशात हलविल्यास कंपनीच्या दुचाकींवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय आहे. अनेक कंपन्या अमेरिकेत येत आहेत. यामध्ये हार्ले डेव्हिडसनच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचाही समावेश आहे. यामुळे अमेरिकेतून बाहेर जाण्याचा कंपनीचा निर्णय चुकीचा ठरेल. 

हार्ले डेव्हिडसनने अमेरिकेतून दुसऱ्या देशात काही उत्पादन प्रकल्प हलविण्याचे सूतोवाच केले आहे. ट्रम्प यांनी युरोपमधील पोलाद आणि ऍल्युमिनियवर जादा कर आकारला आहे. यामुळे युरोपीय समुदायाने हार्ले डेव्हिडसन दुचाकींसह अनेक अमेरिकी उत्पादनांवर जादा कर आकारण्याचे पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका बसत असल्याची तक्रार अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी केली आहे. 

Web Title: Harley Davidson boycott if manufacturing moves overseas