
उत्तराखंडच्या हर्षिल खोऱ्यात धराली इथं पाऊस आणि भूस्खलनामुळे भीषण दुर्घटना घडलीय. गावातील अनेक घरं, हॉटेल्स मातीच्या मलब्यातून वाहून गेली. तर अनेकजण बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर हर्षिलमध्ये आणखी एक धोका निर्माण झाला आहे. हर्षिलमध्ये नवा तलाव तयार झाला आहे. हर्षिल खोऱ्याजवळ एक तलाव तयार झाला असून दृश्य अद्भुत असं दिसत आहे. पण हे सुंदर दृश्य तिथल्या स्थानिकांसाठी मात्र भयावह असं आहे.