
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी बुधवारी प्रधानमंत्री आवास योजना (PMAY), मुख्यमंत्री शहरी आवास योजना, मुख्यमंत्री ग्रामीण आवास योजना आणि १०० यार्डांपर्यंतच्या निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा केली. विधानसभेत ही घोषणा करताना मुख्यमंत्री सैनी म्हणाले की, या सर्व गृहनिर्माण योजनांचे लाभार्थी आणि लहान निवासी भूखंड धारकांना आता मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही.