

Summary
रमेश कुमार गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू करून शवविच्छेदनासाठी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला.
आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके तयार असून लवकरच अटक होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गोंधळ घालणाऱ्या तरुणांना हटकल्याने एका पोलिस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकाराने सगळेच हादरले आहेत. ही घटना हरियाणातील हिसारमध्ये घडली आहे.पोलिस उपनिरीक्षक रमेश यांना विटा आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली. रमेश हे बराच काळ पोलिस विभागात होते आणि पुढील वर्षी जानेवारीमध्ये निवृत्त होणार होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.