panjab
panjabESAKAL

हरियाणातील नेते मोफत वापरतात पंजाब सरकारचे हेलिकॉप्टर; RTIमध्ये धक्कादायक खुलासा

हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला पंजाब सरकारच्या हेलिकॉप्टरने हंसीला गेले होते

हरियाणा सरकारचे नेते पंजाबमधील हेलिकॉप्टर मोफत वापरत आसल्याचे प्रकरण समोर आले आहे. एका आरटीआयमध्ये ही बाब उघड झाली आहे. त्यात म्हटले आहे की, हरियाणा सरकार पंजाब सरकारचे हेलिकॉप्टर मोफत वापरत आहे. पंजाब सरकारच्या दाव्याच्या विरोधात, पंजाब आणि हरियाणामध्ये हेलिकॉप्टर सामायिकरणाचा कोणताही करार नाही. आरटीआय कार्यकर्ते माणिक गोयल यांनी त्यांच्या आरटीआयचा हवाला देत गुरुवारी ही माहिती दिली.

त्यांनी सागितले की ऑगस्ट महिन्यात हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला पंजाब सरकारच्या हेलिकॉप्टरने हंसीला गेले होते. तेव्हा गोयल यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओ मुळे संपूर्ण राज्यात वाद झाला होता. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चुटाला हे पंजाबमधील हेलिकॉप्टर कसे वापरत आहेत, असा सवाल पंजाबमधील जनता आणि विरोधकांनी आम आदमी पक्षाला केला होता.

panjab
Crime: धक्कादायक! प्रियकरासाठी मोठ्या बहिणीने केली लहान बहिणीची हत्या

या सर्व प्रश्नांना उत्तर देताना आम आदमी पार्टीचे मुख्य प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी ट्विट केले की पंजाबचा इतर राज्यांशी हेलिकॉप्टर शेअरिंग करार आहे, ज्या अंतर्गत हरियाणाचे उपमुख्यमंत्री पंजाबचे हेलिकॉप्टर वापरत आहेत. यासोबतच पंजाबचे नागरी उड्डयन संचालक सोनाली गिरी यांनीही विधान केले होते, की, पंजाबचा इतर राज्यांशी करार आहे, ज्या अंतर्गत चौटाला पंजाबमधून हेलिकॉप्टर वापरत आहेत.

त्यानंतर मानसा येथे रहिवासी असलेले गोयल यांनी पंजाबच्या नागरी विमान वाहतूक विभागाकडे आरटीआय दाखल करून इतर राज्यांशी हेलिकॉप्टर शेअरिंग कराराची प्रत मागितली. RTIच्या मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाब सरकारने कधीही कोणत्याही राज्यासोबत हेलिकॉप्टर सामायिक करण्याचा करार केला नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com