Haryana Model Sheetal Chaudhary Case : हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील खारखोडा परिसरात हरियाणवी मॉडेल शीतल उर्फ सिम्मी चौधरी हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. शीतलच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी तिचा प्रियकर सुनील असल्याचं स्पष्ट झालं असून पोलिसांनी (Police) त्याला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत सुनीलनं गुन्ह्याची कबुली दिली असून, नात्यातील तणावातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय.