हरियानात महिलेची बलात्कार करून हत्या 

पीटीआय
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

चंडीगड (पीटीआय) : हरियानाच्या झज्जर जिल्ह्यात एका अनोळखी व्यक्तीने 45 वर्षीय महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. पीडित महिला जेव्हा एकटी घरात होती त्या वेळी ही घटना घडली. या महिलेचा मृतदेह हा घरात सापडला असून, तिचे दोन्ही हात बांधले होते, असे झज्जरचे पोलिस अधीक्षक पंकज नैन यांनी सांगितले. 

पीडित महिलेची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याची शक्‍यता पोलिसांना वाटत आहे, असे त्यांनी सांगितले. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असेही नैन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: In Haryana, raped a woman kill