वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महिला आयएएस अधिकाऱ्याचा लैंगिक छळ

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जून 2018

हरयाना : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) महिला अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे, परंतु तो आरोप अधिकाऱ्याने नाकारला आहे. 28 वर्षीय महिलेने फेसबुकवर हिंदीमध्ये लिहून तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप केला की, "अधिकृत फाइल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया दिल्यामुळे वरिष्ठ अधिकारी मला लैंगिकरित्या त्रास देत आहेत. यासंदर्भात आपली तक्रार तिने चंदीगड पोलिसांना रविवारी ईमेलद्वारे पाठविली आहे, त्याचबरोबर सक्षम अधिकाऱ्याकडेही तिने तक्रार दाखल केली आहे.

हरयाना : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) महिला अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे, परंतु तो आरोप अधिकाऱ्याने नाकारला आहे. 28 वर्षीय महिलेने फेसबुकवर हिंदीमध्ये लिहून तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप केला की, "अधिकृत फाइल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया दिल्यामुळे वरिष्ठ अधिकारी मला लैंगिकरित्या त्रास देत आहेत. यासंदर्भात आपली तक्रार तिने चंदीगड पोलिसांना रविवारी ईमेलद्वारे पाठविली आहे, त्याचबरोबर सक्षम अधिकाऱ्याकडेही तिने तक्रार दाखल केली आहे. राज्याचे मुख्य सचिव डी.एस.धेसी यांना वारंवार फोन कॉल्स व मेसेजेस करुनही प्रतिसाद मिळू शकला नाही, त्यामुळे महिलेने लेखी तक्रारीचे पाऊल उचलले आहे. तिने पुढे सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्याने तिला धमकी दिली आहे की, "अधिकृत फाइल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया लिहिल्यास त्याचा परिणाम तिच्या वार्षिक गोपनीय अहवाला (एसीआर) वर होईल."

तथापि, आरोपी अधिकाऱ्याने त्याच्या विरोधातील हा आरोप नाकारला आहे आणि तो म्हणाला, "मी तिला सल्ला दिला होता की, ज्या फाईल्स इतर अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक चूका दुरुस्त केल्यानंतर तुझ्याकडे आल्या आहेत, अशा फाईल्समध्ये दोष शोधू नको. "फेसबूक पोस्टमध्ये महिलेने आरोप केला आहे की, तिचे वरिष्ठ अधिकारी तिला सात-आठ वाजेपर्यंत कार्यरत राहण्याची सक्ती करत असे. 22 मे रोजी दुपारी त्यांनी मला सांगितले की, मी माझ्या पद्धतीने या फाइलमध्ये सुधारणा करतो आणि त्यांनी फाईल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया नोंदवण्यास नकार दिला. "ते म्हणाले, जर मी त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन केले नाही, तर ते माझी बदली दुसऱ्या ठिकाणी करतील. त्यांनी माझा एसीआर (वार्षिक गोपनीय अहवाल) रिपोर्ट बदलण्याची धमकी दिली."

"वरिष्ठ अधिकाऱ्याने मला 31 मे रोजी एका खोलीत बोलावून घेतले आणि बाकी अधिकाऱ्यांना त्या खोलीत प्रवेश न करण्यास बजावले. त्यांनी मला विचारले की, मला कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे, विभागीय की किरकोळ काम? आणि मग त्यांनी मला फाईल्सवर प्रतिकूल प्रतिक्रिया लिहणे बंद करण्यास सांगितले. त्यांनी मला सांगितले की, नववधूला ज्याप्रमाणे गोष्टी समजावून सांगितल्या जातात, त्याप्रमाणेच मी तुला समजावून सांगेल. त्यावेळी त्यांचे वर्तन अनैतिक होते."

परंतु उच्च अधिकाऱ्याने वरील आरोपांना "निराधार" म्हटले आहे आणि मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. "तिची महिन्याभरापूर्वी माझ्या विभागात बदली झाली आहे, तिने माझ्या कर्मचाऱ्यांकडेही चुकीच्या गोष्टी बोलल्या होत्या. मी त्यांना त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले.

"माझ्या विभागामार्फत कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य काम करुन घेणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी बऱ्याचवेळा तिला अधिकृत फाइल्समध्ये चुका असल्याचे सांगितले होते, परंतु त्या चुका समजावून सांगण्यात काही गैर नाही."असे ते म्हणाले.

फेसबुक पोस्टमध्ये महिलेने लिहिले की, पोलिस सुरक्षा काढून घेतली होती, त्यामुळे तिने त्या घटनेबद्दल राष्ट्रपती कार्यालयात ई-मेल पाठविला आहे.
बुधवारी (6 जून) तिने आरोप केला की वरिष्ठ अधिकाऱ्याने 5 वाजता मला कार्यालयात बोलावून घेतले आणि सायंकाळी 7.39 पर्यंत तिथेच थांबण्यास सांगितले. "मी त्याच्या टेबलच्या समोरच्या खुर्चीवर बसले होते. त्याने मला उठायला सांगितले आणि त्याच्या खुर्चीच्या जवळ ओढले. संगणकावर कसे काम करावे हे समजावण्याच्या उद्देशाने त्याने मला जवळ ओढून मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला."

यावर अधिकारी म्हणाला, "ती ऑफिसमध्ये उपस्थित असताना माझ्या कार्यालयात कोणीतरी असेल असाच प्रयत्न मी केला आहे. मला नाही वाटत, जास्तीत जास्त दोन वेळा काही मिनिटे वगळली तर ती माझ्या ऑफिसमध्ये एकटी नव्हती. "आपल्या दाव्याचे स्पष्टीकरण देताना महिला म्हणाली, "जे काही ते त्याच्या बचावात सांगत आहेत ते खोटे आहे. मी माझ्या फेसबुक पोस्टमध्ये संपूर्ण तपशील दिला आहे. तुम्ही सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करा. सर्व गोष्टी स्पष्ट होतील."

Web Title: Haryana woman IAS officer accuses senior of sexually harassing