पंजाबमध्ये `हरवलेल्यां'मुळे हरियाणात कोरोनाची चिंता

वृत्तसंस्था
Tuesday, 31 March 2020

पंजाबमधून 90 हजार अनिवासी भारतीय बेपत्ता झाल्याचे पत्र पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिले आहे. यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

चंडीगड - कोरोनाचा प्रसार परदेशातून आलेल्यांमुळे जास्त होत आहे हे लक्षात आल्यावर पंजाबमध्ये आलेले 90 हजार अनिवासी भारतीय बेपत्ता झाले आहेत. त्यांच्यामुळे आपल्या राज्यात कोरोना पसरेल अशी भिती हरियाणास वाटत आहे. पंजाबमधून येणाऱ्या या लोकांना रोखण्याचे आदेश हरियाणा पोलिसांना देण्यात आले होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंजाबमधून येणाऱ्यांना रोखण्यासाठी कठोर उपाय करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. पंजाबमधून 90 हजार अनिवासी भारतीय बेपत्ता झाल्याचे पत्र पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिले आहे. यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अंबालात आढळलेला कोरोनाचा रुग्ण हा पंजाबमधून आलेला आहे, असे हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी खाजगी दूरचित्रवाणा वाहिनीस सांगितले.  

- Lockdown : 'होय, आपण संसर्गाच्या मोठ्या टप्प्यावर'; आरोग्य खात्याचा इशारा!

दरम्यान, उत्तर प्रदेश तसेच बिहारमधून येणाऱ्या मजूरांना रोखण्याचेही हरियाणा सरकारने ठरवले आहे. राज्यात प्रवेश केलेल्यांची व्यवस्था खास ठिकाणी करण्यात आली आहे. त्यांना लॉकडाऊन संपेपर्यंत शिबिर न सोडण्यास सांगितले आहे, असे विज यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी हे मजूर काम करती असलेल्या कंपनी प्रमुखांना लक्ष्य केले. आपल्या सेवेत असलेल्यांना 21 दिवस तुम्ही खायला प्यायला देऊ शकत नाही अशी संतप्त विचारणा त्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: haryana worried about 90000 nris from punjab