Lockdown : 'होय, आपण संसर्गाच्या मोठ्या टप्प्यावर'; आरोग्य खात्याचा इशारा!

Luv-Aggarwal
Luv-Aggarwal

नवी दिल्ली : लॉकडाऊन केल्यानंतरही देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (ता.३०) एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसमोरील चिंतेत वाढ होणार आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी म्हटले आहे की, 'गेल्या २४ तासांत देशात आणखी ९२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आता १०७१ वर पोहोचली आहे. तर २९ भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येत असून आतापर्यंत ९९ नागरिकांनी कोरोनाचा यशस्वी सामना केला आहे.'

''मात्र, देश आता स्थानिक संसर्ग (लोकल ट्रान्समिशन)च्या टप्प्यात असल्याने यापुढे अधिक काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. जेव्हा देश कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यात पोहोचेल, तेव्हा त्याबाबत सर्वांना माहिती दिली जाईल, पण आपण या टप्प्यापर्यंत अजून पोहोचलेलो नाही. नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी राज्य आणि केंद्र सरकार देत असलेल्या सूचनांचे १०० टक्के पालन करणे गरजेचे आहे. यात आपण कमी पडलो, तर आपल्याला पुन्हा शून्यापासून सुरवात करावी लागेल.'' 

लव अगरवाल पुढे म्हणाले, 'सुरवातीच्या १२ दिवसांमध्ये देशात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण १०० ते १००० पर्यंत होते. कमी लोकसंख्या असलेल्या विकसित देशांमध्ये १२ दिवसांमध्ये ३०००, ५००० आणि ८००० असे प्रमाण असल्याचे आढळून आले. केंद्र सरकारने लवकर आयसोलेशन आणि लॉकडाऊन ही महत्त्वाची पावलं उचलल्यानं भारतात संसर्ग होण्याचे प्रमाण कमी राहिले आहे.'

जर आपण कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यात पोहोचलो, तर परिस्थिती खूप गंभीर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच कोरोना व्हायरसबाबत अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com