हाथरस प्रकरणात मोठा खुलासा! पीडितेची वहिनी म्हणून घरी राहत होती संशयास्पद महिला 

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 October 2020

हाथरसप्रकरणी सुरु असलेल्या तपासात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.

लखनौ- हाथरसप्रकरणी सुरु असलेल्या तपासात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. हाथरस बलात्कार आणि अत्याचार पीडितेच्या घरी एक बनावट नातेवाईट राहत होती. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एक संशयास्पद महिला पीडितेची वहिनी म्हणून राहत होती.  ही महिला कम्युनिस्ट पक्षाशी जोडली गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. संशयास्पद महिला पीडितेच्या कुटुंबीयाला भडकावत होती, असा आरोप करण्यात येत आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार, संशयित महिला मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील रहिवाशी आहे आणि तिचे नाव डॉ. राजकुमारी आहे. महिला गेल्या काही दिवसांपासून पीडितेच्या कुटुंबीयांसोबत राहत होती. महिला स्वत:ला मेडिकल कॉलेजची प्रोफेसर असल्याचे सांगत होती. महिला सध्या गावातून गायब झाली आहे. या संशयास्पद महिलेचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. व्हिडिओ 6 ऑक्टोबरचा असून, सीपीआय आणि सीपीएमचे सदस्य पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते. तेव्हाचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. 

तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच! भारत बायोटेककडून माहिती गोळा करणे सुरु

संशयित महिला पीडितेच्या कुटुंबीयाला भडकावत होती!

माध्यमांच्या म्हणण्यानुसार, संशयित महिला पीडितेच्या कुटुंबीयांना भडकावत होती. तसेच माध्यमांसमोर काय बोलायचं हे सांगत होते.  एसआयटी महिलेचा शोध घेत आहे. महिला १६ सप्टेंबरपासून गावात राहत होती. याबाबत एसआयटी मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे.

एसआयटीने गावातील ४० जणांची केली चौकशी

हाथरस प्रकरणी एसआयटी तपास करत आहे. एसआयटीने शुक्रवारी पीडितेच्या गावातील ४० लोकांची चौकशी केली. यात आरोपीचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांचाही समावेश होता. दरम्यान,  देशभरात गाजत असलेल्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी आता उत्तर प्रदेश पोलिसांकडून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे देण्यात आली आहे. आज, रात्री सीबीआयने उत्तर प्रदेश पोलिसांकडून तपासाची सूत्रे हाती घेतल्याची माहिती आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hathras case fake women relative of victim