उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना लाठीमार; हाथरस प्रकरणातील मुलीच्या कुटुंबाला भेटण्यापासून रोखले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणारच असं म्हणणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी वाटेतच रोखलं. त्यानंतर यमुना एक्सप्रेस वेवर त्यांनी ठिय्या मांडला आहे.

लखनऊ - हाथरसमध्ये सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झालेल्या पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गेले आहेत. मात्र त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्यानं ते पायी चालत गेले. पण वाटेतच त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी धक्का दिला आणि काठीने मारहाण केली असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणारच असं म्हणणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी वाटेतच रोखलं. त्यानंतर यमुना एक्सप्रेस वेवर त्यांनी ठिय्या मांडला आहे. 

राहुल गांधी यांच्यासोबत कार्यकर्तेसुद्धा असून त्यांनाही मारहाण झाली असल्याचं सागंण्यात येत आहे. हाथरस इथं झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पीडितेचा 29 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

हे वाचा - हाथरस : पीडितेचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; धक्कादायक खुलासा

मृत्यूनंतरही पीडितेच्या कुटुंबियांसोबत अन्याय झाल्यानं हा संताप अधिकच वाढला आहे. पोलिसांनी कुटुंबियांच्या अनुपस्थितीतच मृतदेहावर अंत्यसस्कार केले होते. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hathras case up police pushed and lathicharged me says rahul gandhi