esakal | हाथरस - पीडितेचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; धक्कादायक खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Hathras

मृत्यूआधी पीडीतेने दिलेल्या जबानीत तिने म्हटलं होतं की तिच्यावर बलात्कार झाला आहे.

हाथरस - पीडितेचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; धक्कादायक खुलासा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. पीडीतेच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट समोर आला आहे. सफदरजंग हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पीडीतेचे पोस्टमार्टर केलं आहे. त्यांनी या पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, पीडीतेचा मृत्यू गळ्याचे हाड तुटल्याने झाला आहे. रिपोर्टमध्ये म्हटलंय की वारंवार गळा दाबल्याने पीडीतेच्या गळ्याचे हाड तुटले होते. गळ्यावर याचे खूणाही मिळाल्या आहेत. मात्र, रिपोर्टमध्ये बलात्काराचा उल्लेख नाहीये. 


पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटलंय की, गळा दाबल्यामुळे सर्वायकल स्पाईन तुटले ज्यामुळे त्या तरुणीचा मृत्यू झाला. याआधी अलीगढच्या जेएन मेडीकल कॉलेजच्या रिपोर्टने देखील गळ्याचे हाड तुटल्याचाच निर्वाळा दिला होता. या मेडीकल रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, गळा दाबला गेल्यामुळे सर्वायकल स्पाईनचे  लिगामेंट तुटले. मेडीकल रिपोर्टमध्येही बलात्काराचा उल्लेख नव्हता. 

हेही वाचा - हाथरसची घटना म्हणजे देशावरील न पुसला जाणारा डाग ; अभिनेता फरहान अख्तरची उद्विग्नता

मृत्यूआधी पीडीतेचा व्हिडीओ व्हायरल
मृत्यूआधी पीडीतेने दिलेल्या जबानीत तिने म्हटलं होतं की तिच्यावर बलात्कार झाला आहे. त्यानंतर ओढणीने तिचा गळा दाबला होता. मात्र, तिचा आक्रोस ऐकून तिची आई घटनास्थळी यायच्या आधीच आरोपी पळून गेले होते. या दरम्यानच पीडीतेचा एक व्हिडीओदेखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती असं म्हणताना दिसत आहे की, आरोपींनी तिच्यावर याआधीदेखील बलात्कारचा प्रयत्न केला होता. मात्र, तेव्हा ती त्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरली होती. परंतु, 14 सप्टेंबरला असं झालं नाही. आरोपी संदिप आणि रवीने तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी रामकुमार आणि लवकुशदेखील उपस्थित होते. या घटनेच्या 15 दिवसांनंतर 29 सप्टेंबरला पीडीतेने दिल्लीमधील सफदरजंग हॉस्पीटलमध्ये आपला जीव सोडला. सध्या या प्रकरणातील चारही आरोपी अटक आहेत. 

हेही वाचा - धक्कादायक! हाथरसनंतर बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार; तरुणीचा मृत्यू

एसआयटीद्वारे तपास
या पीडीतेच्या मृत्यूनंतर उसळलेला जनक्षोभ पाहता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय एसआयटी नियुक्त केली आहे. तसेच या प्रकरणाला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा देण्याच्या सुचना दिल्या आहेत.