Hathras stampede: सत्संगातील मृतदेहांचा खच पाहून आला हृदयविकाराचा झटका, जवानाचा जागेवरच मृत्यू...

Hathras stampede 2024: घटनास्थळी प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत.
Hathras stampede news in marathi
Hathras stampede news in marathiesakal

Hathras Stampede: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील एका सत्संग कार्यक्रमाच्या दरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. भोले बाबा यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी जमली होती, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीमुळे काही लोकांना जीव गमवावा लागला आहे. या कार्यक्रमात मृतदेहांचे ढीग लागले होते.

मृतदेहांचे ढीग पाहून क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) ड्युटीवर तैनात कॉन्स्टेबल रवी यादव यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहाची व्यवस्था करण्याचे काम रवी यादवचे होते. एकाच वेळी अनेक मृतदेह पाहिल्यानंतर रवी यादव यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

दुर्घटनेत मृत्यू व जखमी

घटनास्थळी प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Hathras stampede news in marathi
Hathras stampede: हाथरसमध्ये हाहाकार! "माझी मुलगी कुठेच सापडली नाही", आईची शोधाशोध...वाचा प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

प्रशासनाची भूमिका

या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. प्रशासनाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून सुरक्षेच्या उपाययोजनांवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. या दुर्घटनेनंतर कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये झालेल्या त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या दुर्घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये अधिकाधिक दक्षता घेतली जाणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्घटना टाळता येतील. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.​

Hathras stampede news in marathi
Stampede Hathras: हाथरस सत्संग समारंभात चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा वाढला, 60 जणांचा मृत्यू...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com