मुख्यमंत्री उतरले गुडघाभर चिखलात

यूएनआय
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मंड्या - शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्याच्या उद्देशाने कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्वत: शेतात उतरत गुडघाभर चिखलात उभे राहून भाताची रोपे लावली.   

मंड्या - शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्याच्या उद्देशाने कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्वत: शेतात उतरत गुडघाभर चिखलात उभे राहून भाताची रोपे लावली.   

कर्नाटकात मंड्या जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कुमारस्वामी येथे आले होते. शेतकऱ्यांमधील निराशा दूर करण्यासाठी ते शेतकऱ्यांसारखा वेष परिधान करत भात शेतातील गुडघाभर चिखलात उतरले आणि भातलावणी केली. ‘मी येथे कोणाला खूश करण्यासाठी आलेलो नाही. मी राज्यातील शेतकऱ्यांना एक संदेश देऊ इच्छितो की, मी त्यांच्याबरोबर  आहे. त्यांनी आत्महत्या करण्याचा कोणताही विचार मनात आणू नये. तुमची काळजी घेण्यासाठी मी आहे,’ असे कुमारस्वामी म्हणाले. दर महिन्याला एक दिवस याप्रमाणे टप्प्याटप्प्यामध्ये राज्यातील सर्व तीस जिल्ह्यांमध्ये एक दिवस शेतकऱ्यांबरोबर पूर्ण राहून त्यांच्या समस्या समजावून घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. . 

शेतकरी कुटुंबातील असलो तरी आज जवळपास २५ वर्षांनी शेतात कामासाठी पाय ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना शेतात काम करताना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

Web Title: H.D. Kumaraswamy inaugurating a paddy seedling transplantation programme at Seethapura in Pandavapura taluk of Mandya district