Avian Influenza: केरळमध्ये संसर्गाचा धोका वाढला! तपासासाठी केंद्राने पाठवले पथक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

health ministry deploys high level 7 member team to kerala to investigate avian influenza outbreak

Avian Influenza: केरळमध्ये संसर्गाचा धोका वाढला! तपासासाठी केंद्राने पाठवले पथक

केरळमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही दक्षता वाढवली आहे. एव्हियन फ्लूशी संबंधित प्रकरणांची तपासणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सात सदस्यीय पथक केरळला पाठवले. हे पथक तपासाअंती आपला अहवाल मंत्रालयाला सादर करेल आणि हे संकट रोखण्यासाठी उपाय सुचवेल.

हेही वाचा: Airtel 5G vs Jio 5G: कोण देईल चांगली सेवा? दोन्हीत नेमका फरक काय आहे? जाणून घ्या

एव्हियन फ्लूला बर्ड फ्लू असेही म्हणतात. हा इन्फ्लूएंझा (फ्लू) टाइप ए विषाणूच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे. जगभरातील वन्य पक्ष्यांमध्ये त्याचा प्रादुर्भाव दिसून आला आहे, पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या मानवांनाही या संसर्गाचा धोका आहे.

हेही वाचा: Apple प्रेमींसाठी वाईट बातमी! कंपनीने वाढवल्या 11 प्रॉडक्ट्सच्या किंमती; येथे पाहा नव्या किंमत

आरोग्य तज्ञ या फ्लूला खूप प्राणघातक मानतात, ज्यामुळे मानवांमध्ये मृत्यूचे प्रमाण 56 टक्क्यांहून अधिक दिसून आले आहे. मानवी संसर्ग प्रामुख्याने संक्रमित प्राणी किंवा दूषित वातावरणाशी थेट संपर्क साधून होतो. यामुळे शरीरात अनेक गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकतात तसेच काही परिस्थितींमध्ये प्राणघातक देखील असू शकतात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी या प्रकारच्या संसर्गाचा धोका आहे अशा ठिकाणी जाणे टाळावे. चला या गंभीर संसर्गाविषयी सविस्तरपणे समजून घेऊया, यापासून बचाव करण्याच्या उपायांबद्दल जाणून घेऊया.

एव्हियन किंवा बर्ड फ्लू काय आहे

बर्ड फ्लू हा एका प्रकारच्या इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होतो, त्याचा थेट मानवांवर परिणाम होण्याचा धोका नसतो. हा पक्षी, कुक्कुटपालनात होणारा संसर्ग आहे, ज्याद्वारे मानवांमध्ये संसर्ग होतो. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि युरोपच्या काही भागांमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक दिसून आला आहे.

काही प्रकरणांमध्ये, बर्ड फ्लू व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, संसर्ग वाढण्याचा धोका खुल्या बाजारात जिथे अंडी आणि कोंबड्या विकल्या जातात किंवा जिथे पोल्ट्री फार्म आहेत तिथे सर्वाधिक दिसून आले आहे.

टॅग्स :Kerala