esakal | जगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

health ministry press conference

जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासादायक आहे.

जगाला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; कोरोना रुग्णांबाबत केंद्राने दिली माहिती

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती झाली असताना भारतातील मागील 4-5 आठवड्यांची कोरोना आकडेवारी मोठी दिलासादायक आहे. देशात आतापर्यंत जगाच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तसेच जगभरातील देशांच्या चाचण्यांची संख्या पाहता भारत दुसऱ्या स्थानी असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-
1. देशात आतापर्यंत 67 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, तसेच जगातील सर्वात जास्त रिकव्हरी रेट भारतात आहे.
2. 9.6 कोटीपेंक्षा जास्त कोरोना चाचण्या
3. सध्याचा देशातील पॉझिटिव्ह रेट- 7.90
4. एकूण रुग्णांच्या 9.8 रुग्ण सध्या सक्रिय.

Corona Update : आकडे घसरतायत; सोमवारी 60 हजारहून कमी रुग्ण; मात्र काळजी गरजेचीच !

देशातील कोरोना रुग्णांची संख्या ठराविक राज्यात वाढताना दिसली आहे. राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये देशातील सक्रिय रुग्णांपैकी 64 टक्के कोरोना रुग्ण आहेत. 

मागील आठवड्यापासून भारतात 10 लाखांमागे  फक्त 310 कोरोना रुग्ण आढळले आहेत. जगाचा विचार केला तर ही आकडेवारी सर्वात कमी असल्याची माहितीही भूषण यांनी दिली. तसेच देशातील रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा कमी पडणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जात असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सुप्रसिद्ध उद्योगपती आणि जगातील श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी सोमवारी म्हटलं की, कोविड-19 शी लढण्यासाठी भारताचे संशोधन आणि कार्य महत्त्वपूर्ण भुमिका बजावेल. Grand Challenges Annual Meeting 2020 मध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांनी कोरोनावरील लस बनवण्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबतही चर्चा कली.

(edited by- pramod sarawale)