Corona Update : आकडे घसरतायत; सोमवारी 60 हजारहून कमी रुग्ण; मात्र काळजी गरजेचीच !

Corona update
Corona update

कोरोनाचा हाहाकार आता कमी होताना दिसतो आहे. गेल्या काही दिवसांपासून टिपेला पोहोचलेले कोरोनाचे आकडे आता हळूहळू खाली येताना दिसत आहेत. संख्येमधील वाढ थांबली असली तरीही असलेला धोका अद्याप कायम आहेच. कोरोनाच्या आकडेवारींवर नजर टाकली असता लक्षात येते आहे की, आता जगातील कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येने 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. 

हेही वाचा - 'तुमच्या पणजोबांनी तर चीनसमोर गुडघे टेकले, आम्ही हिंमतीने दोन हात करत आहोत'
गेल्या चोविस तासांत देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचे नवे 55,722 रुग्ण सापडले आहे. या नव्या रुग्णांसह एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आता 75,50,273 झाली आहे. तर गेल्या चोविस तासांत 579 लोकांचा कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृतकांची संख्या धरुन सध्या देशांतील मृतांची संख्या वाढून 1,14,610 इतकी झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी आठ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या महिन्यात दुसऱ्यांदा कोरोना संक्रमणाचे आकडे हे 60 हजारच्या खाली नोंद झाले आहेत. तसेच जवळपास तीन महिन्यांच्या नंतर देशांत मृतांची संख्या काल 600 हून कमी मिळाली आहे. देशांत याआधी 13 ऑक्टोबर रोजी 60 हजारहून कमी रुग्णसंख्या सापडली होती. काल 19 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण जगात या रोगाने संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 4 कोटींच्या पार गेली होती. 


सुप्रसिद्ध उद्योगपती आणि जगातील श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी सोमवारी म्हटलं की, कोविड-19 शी लढण्यासाठी भारताचे संशोधन आणि कार्य महत्त्वपूर्ण भुमिका बजावेल. Grand Challenges Annual Meeting 2020 मध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांनी कोरोनावरील लस बनवण्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबतही चर्चा कली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com