esakal | कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची होणार आता क्षयरोग चाचणी!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_TB

कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची होणार आता क्षयरोग चाचणी!

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : कोविडबाबत अद्यापही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या जात आहेत. यामध्ये आता नव्या नियमाची भर पडली आहे. कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची क्षयरोगाची अर्थात टीबीची चाचणी करण्याच्या तसेच क्षयरोग झालेल्या रुग्णांची कोरोनाची चाचणी करण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयानं संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. (Health Ministry Recommended TB Screening For All COVID19 Positive Patients and vice versa aau85)

तसेच कोरोना लसीकरणाबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं की, सर्व राज्यांना कोरोना प्रतिबंधक लसींचे एकूण ४१.६९ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. राज्यांजवळ तसेच खासगी रुग्णालयांमध्ये २.७४ कोटींहून अधिक डोस उपलब्ध आहेत.

हेही वाचा: DRDO विकसीत करतंय ड्रोनविरोधी स्वदेशी तंत्रज्ञान

तसेच १८,१६,१४० अधिक कोरोना लसींच्या डोसचा पुरवठा केला जात आहे. आजपर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ४१,६९,२४,५५० डोस देण्यात आले आहेत. तसेच पुढे १८,१६,१४० डोस देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

loading image