ईदगाह मैदानावरील गणेशोत्सवासंदर्भातील याचिकेसाठी आता तीन न्यायाधीशांचं खंडपीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

supreme court adjourned hearing now in november maharashtra karnataka border issue

ईदगाह मैदानावरील गणेशोत्सवासंदर्भातील याचिकेसाठी आता तीन न्यायाधीशांचं खंडपीठ

नवी दिल्ली : बेंगळुरूमधील चामराजपेट ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थीच्या पूजेला परवानगी देण्याच्या विरोधात आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद झाल्यानंतर हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले आहे. (idgah case news in Marathi)

हेही वाचा: Video : 'मुघलांनी भारताला आकार दिला, मला त्यांचा अभिमान', काँग्रेस खासदाराचं वादग्रस्त विधान

या प्रकरणात हस्तक्षेप करत सरन्यायाधीशांनी ईदगाह प्रकरणाची कागदपत्रे मागितली. सरन्यायाधीशांनी शेवटी निर्णय दिला की इदगाह प्रकरणाची सुनावणी आता तीन न्यायाधीशांच्या खंडपीठामार्फत केली जाईल. न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती एएस ओक आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर काही वेळातच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर बेंगळुरूमधील चामराजपेट ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थीच्या पूजेच्या परवानगीविरोधातील याचिकेवर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात कर्नाटक वक्फ बोर्ड सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. वक्फ बोर्डाचा दावा आहे की हे मैदान आपली मालमत्ता आहे आणि 1964 पासून तेथे ईदची नमाज होत आहे.

हेही वाचा: Sharad Pawar : आगामी लोकसभेपर्यंत शरद पवारांचा प्रभाव कमी होणार; केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान

वक्फ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, पूजेमुळे जातीय तणाव निर्माण होईल, त्यामुळे बोर्ड पूजेच्या परवानगीविरोधात सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. वक्फ बोर्डाने म्हटले की, इदगाह मैदान ही वक्फची संपत्ती आहे आणि ते सार्वजनिक ठिकाण नाही जे सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उघडले जाऊ शकते.

Web Title: Hearing Of Idgah Case In A While Three Judge Bench Will Now Hear

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..