ज्ञानवापी मशिदीची सुनावणी पुढे ढकलली, कोर्टाकडे निर्णय राखीव

Varanasi Gyanvapi Mosque survey Gyanvapi Sangh Parivar will not directly participate in temple mosque protest
Varanasi Gyanvapi Mosque survey Gyanvapi Sangh Parivar will not directly participate in temple mosque protestsakal

देशात सध्या उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणावरून वादळ उठलं आहे. हिंदू संघटना आणि मुस्लीम समुदायात हेवेदावे सुरू झाले आहेत. मशिदीच्या तळघऱात शिवलिंग सापडल्याचा दावा केल्यानंतर या प्रकरणात आणखी महत्वाची माहिती समोर आली. हिंदू पक्षकारांच्या सर्वेक्षणानंतर नव्याने काही खुलासे झाले आहेत. (Gynavapi Mosque News)

या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. मात्र, कोर्टाने 19 मे रोजी ज्ञानवापी मशीद प्रकरणात पुढील सुनावणी उद्या म्हणजेच शुक्रवारी घेतली जाईल, असे निर्देश दिले आहेत. तसेच वाराणसीतील ट्रायल कोर्टाला या दरम्यान पुढील कार्यवाही स्थगित करण्याचे आदेश पारित केले आहेत. Gyanvapi mosque hearing)

Varanasi Gyanvapi Mosque survey Gyanvapi Sangh Parivar will not directly participate in temple mosque protest
Gyanvapi Masjid सर्वेक्षण पूर्ण; विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा

दरम्यान, मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष सहाय्यक आयुक्तांचा अहवाल गुरुवारी वाराणसी न्यायालयासमोर सादर करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीबाबत जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर नोटीस जारी केली होती. तसेच मशिदीच्या आतील भागात, म्हणजेच त्या ठिकाणी कथित शिवलिंग असल्याचे सांगितले जात होते, त्यावरच हिंदू पक्षकारांचा दावा असल्याचं म्हटलं होतं.

मात्र, या प्रकऱणाने पेट घेतल्यानंतर मशिदीचा परिसर सील करण्यात आला. तरीही मुस्लिमांना मशिदीत प्रवेश करण्यास आणि प्रार्थना करण्यास प्रतिबंध घालून नये, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.

वाराणसी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार ज्ञानवापी मशिदीचं तीन दिवस सर्वेक्षण करण्यात आलं. मंगळवारी वाराणसी न्यायालयाने समितीला अहवाल सादर करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत दिली. मुस्लिमांना मशिदीत प्रवेश आणि नमाज पठण करण्यास प्रतिबंधत न करता, ज्या भागात 'शिवलिंग' सापडल्याच्या दावा होत आहे, तो भाग सुरक्षित करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

न्यायालयाने नियुक्त केलेले विशेष सहाय्यक आयुक्त अधिवक्ता विशाल सिंह यांनी एएनआयला याबद्दल माहिती दिली. ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण अहवालासह त्यांनी सीलबंद कव्हरमध्ये व्हिडीओ चिपसहीत दिल्याचं ते म्हणाले. या सर्व बाबी न्यायालयासमोर सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com