IMDचा पाच राज्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट; कमाल तापमानाचा उच्चांक

१ मे पर्यंत उष्ण लहरींची परिस्थिती कायम राहिल असंही IMDनं म्हटलं आहे.
HEAT WAVE AND GLOBAL WARMING
HEAT WAVE AND GLOBAL WARMING

नवी दिल्ली : भारतातील अनेक भागांना सध्या उष्ण लहरींचा तडाखा बसला असून अनेक भागातील तापमान ४५ डिग्री सेल्सिअसच्यावर गेलं आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्यानं (IMD) दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील पाच राज्यांना ऑरेंज अॅलर्ट जाहीर केला आहे. १ मे पर्यंत ही उष्ण लहरींची परिस्थिती कायम राहिल असा इशाराही IMD कडून देण्यात आला आहे. (Heatwave in India IMD issues orange alert for 5 states)

राजस्थान, दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या पाच राज्यांना उष्ण लहरींचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमधील अनेक भागांमध्ये तापमान ४५ डिग्री सेल्सिअसच्यावर राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पंजाब, हरयाणा-चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमधील गंगेचं खोरं, ओडिशा तसेच गुजरातमधील उत्तर भागातही उष्ण लहरी कायम राहण्याचा अंदाज आहे.

HEAT WAVE AND GLOBAL WARMING
हल्ल्याच्या चौकशीसाठी सोमय्यांची हायकोर्टात धाव; केली 'ही' महत्वाची मागणी

दरम्यान, राजस्थान, गुजरात आणि आंध्र प्रदेशात एसी आणि पंख्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने कारखान्यांसाठी वीज कपात लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पाण्याच्या तुटवड्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे. गहु उत्पादकांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. यामुळं गहु निर्णायतीवरही याचा परिणाम होणार आहे, सध्या युक्रेनमध्ये युद्ध सुरु असल्यां जगाला गव्हाचा तुटवडा भासू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com