कोस्टल कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

कोस्टल कर्नाटकमध्ये आज (मंगळवार) जोरात पाऊस सुरू झाला असून, मंगळूरू आणि उडपी मध्ये मुसळधार पाऊस चालू आहे.

कर्नाटक (मंगळूरु) - कोस्टल कर्नाटकमध्ये आज (मंगळवार) जोरात पाऊस सुरू झाला असून, मंगळूरू आणि उडपी मध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. दोन्ही शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून दोन्ही शहरांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊससमुद्र किनाऱ्यावरच्या लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचबरोबर बचावपथके मंगळूरू मध्ये दाखल झाली आहेत. या पावसात मंगळूरूच्या समुद्रात एक बोट बुडाली आहे. बोटीत एकूण 7 जण होते त्यापैकी बोटीवरच्या 5 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, बोटीवरचे 2 जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे.

Web Title: Heavy rain in coastal Karnataka