
Darjeeling Floods Six Killed as Iron Bridge Collapses Amid Torrential Rains
Esakal
पश्चिम बंगालला मुसळधार पावसानं झोडपलं असून अनेक भागात अतिवृष्टी झालीय. दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसामुळे मिरिक भागातील एक लोखंडी पूल कोसळून दुर्घटना घडलीय. यात ६ जणांचा मृत्यू झाला असून काही जण बेपत्ता असल्याची माहिती समजते. कोसळलेला पूल मिरिक आणि जवळपासच्या भागाला सिलीगुडी-कुर्सियांगला जोडत होता. मुसळधार पावसात घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला आहे. पूल कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने बचावकार्य सुरू केलंय. भूस्खलन आणि पुराचा धोका असल्यानं बचावकार्यातही अडथळे येत आहेत.