गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने विविध लघु तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. राधानगरी तालुक्यातील हसणे लघु तलावही सध्या दुथडी भरून वाहत असून हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.