Marathi Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Live Updates on Maharashtra Rains, Ketan Agarwal Case, Anna Hazare, and PM Modi Visit : मुंबई-पुण्यातील पावसाची स्थिती, केतन अग्रवाल हत्या प्रकरण, सिया गोयल, अण्णा हजारे यांचा उपोषणाचा इशारा, पीएम मोदींचा राजस्थान दौरा आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स.
Marathi Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...
Updated on

Vidarbha live : विदर्भात पावसाचा जोर कमी होणार

नागपूर, ता. ५ : जवळपास दोन आठवड्यांपासून विदर्भात नियमित हजेरी लावणारा पाऊस आता काहीसा ब्रेक घेण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाचा आणखी एक-दोन दिवस यलो अलर्ट असून, त्यानंतर कोणताही इशारा नसल्याने पावसाचा जोर किंचित कमी होणार आहे. २२ जूनला मॉन्सूनचे आगमन झाल्यापासून नागपूर व विदर्भात जवळपास रोजच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. यलो अलर्ट असूनही रविवारी दिवसभर शहरात पावसाचा थेंबही पडला नाही. मात्र, ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात तीन अंशांची घसरण झाल्याने उकाडा कमी जाणवला. विदर्भात आणखी एक-दोन दिवस यलो अलर्ट असल्यामुळे पावसाची शक्यता आहे. त्यानंतर अलर्ट नसल्याने पावसाचा जोर कमी होऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com