esakal | मुंबईत सध्या ALL Ok, जाणून घ्या लोकलच्या updates
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-Rains-Local-Traffic-Jam

मुंबईत सध्या ALL Ok, जाणून घ्या लोकलच्या updates

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: एक ते दोन तासाचा मुसळधार पाऊसही (heavy rain in mumbai) मुंबई ठप्प (to stop mumbai) करण्यासाठी पुरेसा असतो. शनिवारी रात्री काही तास कोसळलेल्या पावसाने मुंबईची दैना उडवली. संरक्षक भिंत (protection wall) कोसळून आणि अन्य वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये (incidents) ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. रविवारी दिवसभर अधन-मधन पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आज सोमवार सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे. पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी रिमझिम सर मध्ये-मध्ये येऊन जातेय. (Heavy rain prediction in mumbai but now traffick & local running without disruption dmp82)

सध्या कुठेही पावसाचं पाणी साचलेलं नाही. रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे. पण मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. पण आता वाहतूक पूर्ववत झालीय.

हेही वाचा: 'सामना'मध्ये हेडलाईन येईल "आमचीच लाल आमचीच लाल"; मनसेचा टोला

हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर वाहतूक सुरु आहे.ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहेत. ठाणे ते खोपोली , कसारा मार्ग सुरू आहे. पश्चिम, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्ग सुरळीत सुरु आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.

हेही वाचा: घरातच पाण्यातून शॉक लागून महिलेचा मृत्यू, वांद्रयातील घटना

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. त्यात आज सकाळी साडेसात वाजता भरतीची वेळ होती. ३.६० मीटर उंचीच्या लाटा मुंबईला धडकल्या होत्या. गेल्या २४ तासात मुंबई शहरात सरासरी ४१.८८ मिमी, पश्चिम उपनगरात ५१.८९ मिमी आणि पूर्व उपनगरात ९०.६५ मिमी पाऊस कोसळला.

loading image