मुसळधार पावसाने दिल्लीकरांची उकाड्यापासून सुटका!  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

भारतीय हवामान विभागाने आगामी दोन दिवस दिल्लीत पावसाचे दिवस असल्याचे भाकीत वर्तवले आहे. आज सकाळी पासूनच दिल्लीच्या चारही प्रमुख भागांसह दिल्ली आणि एनसीआर विभागात पाऊस सुरू झाला काही वेळातच त्याने जोर पकडला.

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात कहर करणाऱ्या पावसाने पहाटेपासून राजधानी दिल्लीत ठाण मांडले. सून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने' दिल्लीकरांची असह्य उकाडातून काहीशी सुटका झाली, मात्र पावसामुळे जागोजागी पाणी साचून कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.

भारतीय हवामान विभागाने आगामी दोन दिवस दिल्लीत पावसाचे दिवस असल्याचे भाकीत वर्तवले आहे. आज सकाळी पासूनच दिल्लीच्या चारही प्रमुख भागांसह दिल्ली आणि एनसीआर विभागात पाऊस सुरू झाला काही वेळातच त्याने जोर पकडला. सकाळी दहापर्यंत थांबून थांबून मध्ये पाऊस येत होता. या पावसामुळे दिल्लीकरांची असह्य उकाडायातून सुटका झाली. गेले काही दिवस 35, 37 अंश सेल्सिअस इतक्या उकाड्याने हैराण झालेल्या दिल्लीकरांना या पावसाने निर्माण झालेला सुखद गारवा हवाहवासा न वाटता तरच नवल! मात्र याच पावसाने रस्त्यांवर तळी साचली आणि कार्यालयांमध्ये जाण्याची लगबग असलेले दिल्लीकर महाभयंकर ट्रॅफिक जाम मध्येही अडकले. 

ब्रिटिशांनी बसवलेल्या लुट्टियनस दिल्लीमध्ये रस्ते चकचकीत असले तरी पावसाचे पाणी ची व्यवस्था जुनी असल्याने मंडी हाऊस, सिकंदरा अशोका आणि अकबर, यासारखे रस्ते, दीनदयाळ उपाध्याय मार्ग, निजामुद्दीन, आश्रम, मिंटू ब्रिज अशा भागांमध्ये पावसामुळे वाहतुकीची दैना होते. दिल्लीच्या अन्य भागांमध्ये अनधिकृत कॉलनी आहेत यातील नागरिकांचे हाल तर विचारायलाच नकोत. आजच्या पावसानेही सकाळी रोजीरोटीसाठी निघालेल्या चाकरमान्यांना अनेक अडचणींना तोंड देत ऑफिस गाठावे लागले.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains and traffic jam in Delhi