बेळगावात पावसामुळे घरांची पडझड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

बेळगाव - गेल्या तीन दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शहरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी घराच्या भिंती कोसळून नुकसान झाले आहे.

बेळगाव - गेल्या तीन दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शहरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी घराच्या भिंती कोसळून नुकसान झाले आहे.

शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे नदी, नाल्यांमधील पाण्यात वाढ झाली तर पावसामुळे रयत गल्लीतील शेतकऱ्याचा गोठा कोसळून मोठे नुकसान झाले आहे. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास रयत गल्ली वडगावमधील गजानन कल्लाप्पा बिर्जे या शेतकऱ्याचा चार गुरांचा संपूर्ण गोठाच जमीनदोस्त झाला आहे. यात म्हैस जखमी झाली. 

गांधीनगर येथील काही भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. भांदुर गल्ली येथे ड्रेनेजमधील सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Belgaum