
दिल्ली : देशात विविध राज्यांत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक राज्यांतील नद्यांची पाणीपातळी वाढली असून सखल भागात पाणी शिरले आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, ओडिशा यांसह विविध राज्यांतील अनेक गावांचा संपर्क पावसामुळे तुटला आहे.