

Nepal helicopter crash
esakal
Miracle survival helicopter crash : नेपाळमधील खोटांग जिल्हा येथे बुधवारी हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान मोठा अपघात टळला. Air Dynasty या कंपनीचे हेलिकॉप्टर उतरतानाच अचानक पलटी होऊन दुर्घटनाग्रस्त झाले. या हेलिकॉप्टरमध्ये एका कुटुंबातील पाच जण प्रवास करत होते. ते काठमांडू येथून आपल्या नातेवाइकांच्या अंत्यसंस्कारासाठी खोटांगकडे जात होते.