२६/११ च्या हल्ल्यात हत्या करण्यात आलेल्या ‘कुबेर’च्या तीन मच्छीमार कुटुंबीयांना मदत

Mumbai-Attack
Mumbai-Attack

नवसारी - मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी वाटेत गुजरातच्या पाच मच्छीमारांची हत्या केली होती. या मच्छीमारांपैकी तिघांच्या कुटुंबीयांना गुजरात सरकारकडून नुकतीच प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात आली. बारा वर्षानंतर पीडित कुटुंबांना अर्थसाह्य मिळाले आहे. उर्वरित दोन मच्छीमारांना यापूर्वीच वेगवेगळ्या संस्थांकडून आर्थिक मदत देण्यात आली असून त्यात कुबेर नावाच्या ट्रॉलरचा मालक अमरसिंह सोलंकी याचा समावेश आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नातू राठोड, मुकेश राठोड आणि बलवंत तांडेल अशी त्या मृत मच्छीमारांची नावे असून ती जालापोर तालुक्यातील वनसी गावचे रहिवासी होत. त्यांचे कुटुंबीय बऱ्याच वर्षांपासून आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत होते. गेल्या आठवड्यात गुजरात सरकारकडून पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुदत ठेवीच्या रूपातून देण्यात आले. नवसारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या महसूल अधिकारी रोशनी पटेल म्हणाले की, सरकारी नियमांनुसार तीन मच्छीमारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तीन वर्षाच्या लॉक-इन मुदत ठेवीच्या रूपातून दिले. फेब्रुवारी २०१७ रोजी नवसारीच्या न्यायालयाने तिन्ही मच्छीमारांना मृत म्हणून जाहीर केले. कारण ते मृत असल्याचे सिद्ध न झाल्याने मदत दिली गेली नव्हती. 

सोलंकीच्या मुलास नोकरी
ट्रॉलरचा मालक अमरसिंह सोलंकी हे केंद्रशासित दीवचा रहिवासी होता. सोलंकी कुटुंबीयाला महाराष्ट्र सरकारकडून अगोदरच आर्थिक मदत करण्यात आली आहे. ही बोट मुंबईजवळ सापडली होती. त्याच्या मुलाला दीव दमणच्या प्रशासनाने पोलिस खात्यात नोकरी दिली आहे. यादरम्यान गुजरात सरकारने नोव्हेंबर २०१९ रोजी अन्य मच्छीमार रमेश बाभांनिया (रा. सिमान्सी, गीर सोमनाथ) यांच्या पत्नीला पाच लाख रुपयांची मदत दिली. सोलंकी यांचा मृतदेह सुरक्षा दलाला मुंबईच्या किनाऱ्यावर सापडला. दहशतवाद्यांनी कॅप्टन सोलंकी यांना मुंबईचा रस्ता दाखवण्यासाठी जिवंतपणे किनाऱ्यांपर्यंत आणले असावे, असा पोलिसांचा कयास आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com