

India Releases Toll Free Number For Citizens In Dubai
Esakal
मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात चिंतेची स्थिती निर्माण झालीय. इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर जगातील विमानसेवेला मोठा फटका बसला आहे. अनेक लोक आखाती देशांमध्ये अडकून पडले आहेत. भारतातील ८० लाखांपेक्षा जास्त अनिवासी भारतीय आखाती देशांमध्ये आहेत. यातील दुबईत अडकलेल्या नागरिकांनी भारतीय दूतावासाशी संपर्क करण्याचे आवाहन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलं आहे.