Kashmir Guide : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात छत्तीसगडच्या ११ पर्यटकांचा जीव धोक्यात आला होता. नजाकत शाह या धाडसी गाइडने प्रसंगावधान राखत त्यांना वाचवले.
रायपूर : काश्मीरचे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटनासाठी गेलेल्या छत्तीसगडच्या अकरा जणांचा गट पहलगामच्या हल्ल्याच्या टप्प्यात होता, मात्र एका टुरिस्ट गाइडने प्राणाची बाजी लावत या कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी नेले आणि मोठे संकट टाळले.