
दिल्ली विमानतळावर मोठी कारवाई, ४०० कोटींचे हिराॅईन जप्त
दिल्ली : आफ्रिकन देश युगांडातून ट्राॅली बॅगेत लपवून आणण्यात आलेल्या ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे हिराॅईन आर्थिक गुप्तचर विभागाने दिल्ली (Delhi) विमानतळावर जप्त केले आहे. हा अंमलीपदार्थ ३३० ट्राॅली बॅगमध्ये लपवले होते. माहितीनुसार आर्थिक गुप्तचर संस्थेला गुप्त माहिती मिळाली होती, की युगांडातून सौदी अरबच्या मार्गाने येणाऱ्या कार्गो विमानात हिराॅईनचा मोठा साठा येणार आहे. (Heroin Worth More Than 400 Crores Seized In Delhi Airport)
हेही वाचा: PHOTOS | औरंगाबादमध्ये ३०० पेक्षा जास्त घरांवर बुलडोझर, कुटुंबांचा आक्रोश
त्यानुसार कार्गो विमानातून आलेले ट्राॅली बॅगची तपासणी केली असता त्यात जवळपास ५५ किलो हिराॅईन जप्त करण्यात आले. एकूण ३३० ट्राॅली बॅगांपैकी १२६ बॅग असे होते, की ज्यात हिराॅईन लपवले गेले होते. इतर अन्य घटनांमध्ये पंजाब आणि हरियाणामधून ही सात किलो हिराॅईन पकडले गेले.
हेही वाचा: बाळासाहेबांच्या नावाखाली आणखी किती काळ दिशाभूल ? भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका
आर्थिक शाखेनुसार पकडलेल्या हिराॅईनची एकूण किंमत जवळपास ४३४ कोटी रुपये आहे. दुसरीकडे कार्गोतून आणलेले हिराॅईनचा सर्वात मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
Web Title: Heroin Worth More Than 400 Crores Seized In Delhi Airport
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..