
मुंबई: भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानकडून संभाव्य हल्ला किंवा दहशतवादी कारवाई होण्याच्या शक्यतेने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी आणि दहशतवाद्यांच्या कायमस्वरूपी हिटलिस्टवरील असलेल्या मुंबईला हाय अलर्ट मिळाला असून, विमानतळ, रेल्वेस्थानकांसह शहरातील संवेदशनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.