मोदींच्या भेटीपूर्वी जम्मू-काश्मिरमध्ये हाय अॅलर्ट 

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

श्रीनगर : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (ता.19) जम्मूमध्ये नियोजित भेटीसाठी येणार आहेत, तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मिरमध्ये 5 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भुयारातून शिरकाव करुन सीमारेषा पार केल्याची माहिती सूत्रांकडुन मिळाली आहे. 

सोमवारी दहशतवाद्यांनी सांबा येथील सीमारेषा पार करण्यासाठी शिरकाव केल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाने दिली. सूत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, काल सीमा भागात काही अज्ञात व्यक्ती पाहिल्याचे आढळुन आले होते, पण आता ते गायब आहे.

सीमा सुरक्षा दल या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे कार्य तत्परने करत आहे. शनिवारी उत्तर काश्मिरमध्ये किशनगंगा या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणे अपेक्षित आहे. अशा वेळीच सीमा क्षेत्रात होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीमुळे तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली आहे.  

"सैन्याच्या अहवालानुसार सीमा क्षेत्रात झालेल्या संशयास्पद हालचालींमुळे हाय अॅलर्टचा इशारा दिला आहे.", असे कठुआ येथील पोलिस अधीक्षक श्रीधर पटेल यांनी सांगितले. "हवाई सैन्य दक्षता बाऴगत आहे. अतिरीक्त चेक पॉईंट्स बसवले आहेत. महामार्गावर पाळत ठेवली आहे. तसेच कथुआ, सांबा आणि जम्मू जिल्ह्यातील महामार्गावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना अॅलर्ट देण्यात आला आहे.", असेही पटेल यांनी सांगितले.

Web Title: high alert in jummu kashmir before modis visit