एका उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी स्वत:ला एका प्रकरणाच्या सुनावणीपासून दूर केलंय. आमदाराने कॉल करून चर्चेला बोलावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केलाय. मध्य प्रदेश हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी केलेल्या या आरोपाने खळबळ उडाली. न्यायमूर्ती विशाल मिश्रा यांनी म्हटलं की, भाजपचे आमदार संजय पाठक यांनी एका प्रकरणात मला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.