भारतातील आतापर्यंतची सर्वांत मोठी छापेमारी; जप्त केलेली संपत्ती वाचून व्हाल थक्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतातील आतापर्यंतची सर्वांत मोठी छापेमारी; जप्त केलेली संपत्ती वाचून व्हाल थक्क

भारतातील आतापर्यंतची सर्वांत मोठी छापेमारी; जप्त केलेली संपत्ती वाचून व्हाल थक्क

भुवनेश्वर: भारतात कुठे ना कुठे छापेमारी होतच असते. या छापेमारीनंतर बहुतेकदा संपत्ती जप्त केली जाते. मात्र, एका छापेमारीनंतर इतकी संपत्ती जप्त करण्यात आली आहे की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा छापा असल्याचं मानलं जातंय. ओडिशातील दक्षता पथकानं भ्रष्टाचाराविरोधात ही मोठी कारवाई केली आहे.

हेही वाचा: कोकणातील रिफायनरीबाबत आदित्य ठाकरेंच मोठं वक्तव्य, म्हणाले..

या पथकानं एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला असून या अधिकाऱ्याच्या घरात तब्बल १.३६ कोटी रुपयांची रोकड रक्कम हाती लागली आहे. इतकंच नव्हे, तर या रकमेसोबतच कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रंदेखील मिळाली असून छापा मारणाऱ्या अधिकाऱ्यांनी ती जप्त केली आहेत. इतकी बलाढ्य संपत्ती पाहून छापा टाकणारे अधिकारी देखील अंचबित झाले आहेत.

ओडीसामधील मलकानगरीमधील सरकारी अभियंता आशीष कुमार दासला गेल्या शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलंय. हा व्यक्ती तेंव्हा डीसीबी बँकेच्या व्यवस्थापकाला १०.२३ लाख रुपये देण्यासाठी गेला होता. या प्रकरणी या अभियंत्याला ताब्यात घेतल्यानंतर दक्षता पथकानं त्याच्यावर लक्ष ठेवून अधित तपास सुरु केला. काही दिवसांनंतर त्याच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या छापेमारीमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू मिळाल्या आहेत.

हेही वाचा: 'झेलेन्स्कीला सांगा, मी त्यांना मारीन..' शांतता प्रस्तावानंतर पुतीन संतापले

कारवाईत काय सापडलं?

  • १.३६ कोटी रुपयांची रोकड

  • १.२ किलो सोनं

  • नातेवाईकांच्या नावे ऍक्सिस बँकेत १२ खाती

  • त्यामध्ये जवळपास २.२५ कोटी रुपये

  • एफडी, बचत खात्यांमध्ये ४ कोटी रुपये

  • पत्नीच्या नावे फ्लॅट - किंमत ३२.३० लाख रुपये

  • पत्नीच्या नावे केओन्जर जिल्ह्यातल्या बारिपाल येथे भूखंड

Web Title: Highest Ever Seizure By Odisha Vigilance Raids Continue On Superintendent Engineer Properties

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Odisha